मोदी सरकारचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी मोठ्या घडामोडी; शेवटच्या क्षणी राहुल गांधींकडून प्रयत्नांची शर्थ, स्टॅलिन-पवारांची भेट घेणार

Foto
नवी दिल्ली: केंद्र सरकारने उद्यापासून संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले असून या अधिवेशनात मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मांडले जाणार आहे. या विधेयकाच्या निमित्ताने काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीत मोठी फूट पडली असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि द्रमुक हे दोन पक्ष या विधेयकाला पाठिंबा देणार, हे स्पष्ट झालं आहे. हे विधेयक मंजूर झाल्यास विरोधकांची राजकीय वाट आणखी काटेरी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर सदर विधेयक मंजूर होऊ नये, यासाठी काँग्रेस शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळत आहे. मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला दिलेला पाठिंबा मागे घ्यावा, अशी विनंती करण्यासाठी काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि सोनिया गांधी या आज दुपारी द्रमुकचे प्रमुख एम. के. स्टॅलिन यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर हे तिघेही सायंकाळी मुंबईत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेणार असल्याचे समजते.

तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांची भेट घेण्यासाठी थोड्याच वेळात राहुल गांधी, सोनिया गांधी आणि खर्गे हे एकाच विमानाने चेन्नईला रवाना होणार असल्याची माहिती आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डीही विमानात या नेत्यांसोबत असणार आहेत. संसदेत हे महत्त्वाचे विधेयक सादर होण्यास अवघे काही तास सुरू असताना काँग्रेस नेतृत्वाकडून होणार्‍या या गाठीभेटींना सकारात्मक प्रतिसाद मिळणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

काँग्रेसमध्ये संभ्रम, पवारांबाबत नेमकी भूमिका काय?
राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाकडून मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा दिला जाऊ शकतो, असे संकेत मिळाल्यापासून काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी शरद पवार, सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी (शप) पक्षावर टीकेची झोड उठवली होती. मात्र, या विधेयकाला शरद पवार यांच्या पक्षाने पाठिंबा दिला, तरीही ङ्गइंडियाफ आघाडीतील त्यांचे स्थान कायम राहील, असे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी स्पष्ट केले. या वक्तव्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसमधील नेत्यांची अडचण वाढली असून, ते संभ्रमात पडले आहेत.

सत्तेसाठी भूमिका बदलल्याचा आरोप विधानसभेतील काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी शरद पवार यांच्यावर केला होता. मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देणे म्हणजे पाठीत खंजीर खुपसण्यासारखे असल्याची टीकाही त्यांनी केली होती. महाराष्ट्र काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे-पाटील यांनीही समाजमाध्यमांवर सूचक पोस्ट करत राष्ट्रवादी (शप) पक्षाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला. काँग्रेसने राष्ट्रवादीची साथ दिली, तरी त्यांनी या विधेयकाला पाठिंबा का दिला, असा प्रश्न त्यांनी केला. काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव सचिन सावंत यांनीही, हा निर्णय ङ्गइंडियाफ आघाडीच्या बैठकीत घेतला गेला पाहिजे होता, असे मत व्यक्त केले.

रोहित पवार यांच्या या घोषणेमुळे सरकारची कोंडी होणार?      
काँग्रेसच्या अधिकृत ङ्गएक्सफ हँडलवरूनही या विधेयकाला पाठिंबा देणे म्हणजे देशद्रोहाला समर्थन देण्यासारखे असल्याची टीका करण्यात आली. भाजपच्या पापात पुरोगामी पक्षांनी भागीदार होऊ नये, अशी भूमिका मांडण्यात आली. तसेच, काँग्रेसने यापूर्वी शरद पवार यांच्या राज्यसभा उमेदवारीला पाठिंबा दिल्याची आठवण करून देत राष्ट्रवादीवर टीका करण्यात आली. दरम्यान, घटनादुरुस्ती विधेयकाला संसदेत संयुक्तपणे विरोध करण्याचा निर्णय ङ्गइंडियाफ आघाडीच्या नेत्यांनी शनिवारी घेतला. हे विधेयक अनुसूचित जाती-जमातींच्या हिताविरुद्ध असून, भाजप-रा. स्व. संघाकडून सत्तेवर कायमस्वरूपी कब्जा करण्याचा आणि देशातील लोकशाही संपवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला.

द्रमुकचा पाठिंबा
केंद्राच्या प्रस्तावित मतदारसंघ पुनर्रचना विधेयकांना द्रमुकने शनिवारी पाठिंबा जाहीर केला. सर्व राज्यांतील जागा ५० टक्क्यांनी वाढवण्याचा प्रस्ताव मान्य असल्याचे खासदार ए. राजा यांनी सांगितले. तमिळनाडूचा लोकसभेतील वाटा सुरक्षित राहिल्याचे द्रमुकने म्हटले आहे. काँग्रेसवर टीका करत, भूमिका बदलणे हा तिचा स्वभाव असल्याचा आरोपही पक्षाने केला.

सोमवारपर्यंत वाट पाहणार
राहुल गांधी यांनी शरद पवार यांच्या पक्षाचे ङ्गइंडियाफ आघाडीतील स्थान कायम राहील, असे शनिवारी सायंकाळी स्पष्ट केल्याने काँग्रेस नेत्यांची कोंडी झाली आहे. या पार्श्वभूमीवर, शरद पवार अजूनही भाजपला न भुलता ङ्गइंडियाफ आघाडीसोबत राहतील, अशी अपेक्षा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केली. ङ्गराष्ट्रवादीफकडून अधिकृत भूमिका स्पष्ट झालेली नसून काँग्रेस सोमवारपर्यंत वाट पाहणार असल्याचे त्यांनी सांगितले.